पुढारीच्या पाठीत खंजीर खुपसून एस.के.एकमतच्या दारात

औरंगाबाद - बेरक्याची बातमी शंभर टक्के खरी ठरली आहे.कार्यकारी संपादक म्हणून निवड झालेल्या एस.के.ने पुढारीच्या पाठीत खंजीर खुपसून एकमतची वाट निवडली आहे.त्यामुळे नकटीच्या लग्नाला शतराशे साठ विघ्ने अशी पुढारीची अवस्था झाली असून,येत्या १७ सप्टेंबरचा मुहूर्त पुढे ढकलण्याची पाळी पुढारीवर येणार आहे.आतापर्यंत एस.के.ने दिव्य मराठी,लोकमत आणि आता पुढारीस धोका दिला असून,त्याची विश्वासर्हता फार धुळीला मिळाली आहे.
आर.टी.आणि एस.के.ची मागील लोच्यावरून पुण्यनगरीतून हकालपट्टी झाल्यानंतर आर.टी.पुन्हा पुढारीच्या दारात गेले होते,परंतु तेथे कल्याण पांडे यांनी जागा अडवून ठेवल्याने त्यांनी देशमुखांच्या बाभुळगावची गढी गाठली.सोबत परममित्र,परमस्नेही आणि ग्लासमेंट एस.के.होते.दोघांनी अमित देशमुख यांना एक कोटीची ऑफर दिली.तुम्ही औरंगाबाद आवृत्ती सुरू करा,सर्व खर्च भागवून वर्षाला एक कोटी आणि शिवाय तुमची सारी प्रसिध्दी करून देण्याचा विडा उचलला.
हे दोघेही बीडच्या ताईची शिफारस घेवून गेले होते.ताई लातूरच्या पालकमंत्री आणि वडीलांपासूनचे नाते,यामुळे अमित भैय्यांनी होकार दिला असून,आर.टी.हे एकमतचे सरव्यवस्थापक तर एस.के.हे औरंगाबाद आवृत्तीचे संपादक असा बेत ठरला आहे.त्यामुळे एस.के.पुढारीत जॉईन झाले नाहीत.इकडे लातूरला पुढारीतून आलेल्या मंगेशास कसलाही थांगपत्ता नाही.सारे काही परस्पर ठरले जात आहे.मंगेशाही सपशेल फेल ठरल्याने एस.के.ची टांगती तलवार मंगेशाच्या डोक्यावर लटकणार आहे.
पुढारीच्या कार्यकारी संपादक पदासाठी एस.के.ची निवड केल्यास मोठी समस्या निर्माण होईल,असा इशारा बेरक्याने दिला होता,परंतु पद्मश्रींच्याजवळ असलेल्या सुरेश पवार यांनी मोठा घोळ गेला.त्यांनी एस.के.ची निवड केली.एस.के.पुढारीत आल्यामुळे पिंपळवाडकर पुण्यनगरीत गेले.आता तेल गेले,तूप गेले आणि हाती धुपाटणे आले अशी म्हणण्याची पाळी पुढारीवर आली आहे.
पुढारीची औरंगाबाद आवृत्ती १७ सप्टेंबर रोजी सुरू होणार होती.अजून कार्यकारी संपादकाचा पत्ता नाही.आहे ते चार दोन कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी जात आहेत.त्यामुळे पुढारीचा लॉचिंगपुर्वीच फियास्को झाला आहे.
जिथे आर.टी.तिथे एस.के.ही जोडगोळी का,याचे उत्तर आहे,पॉकेट जर्नालिझम.या दोघांच्या अनेक सुरस कथा बेरक्याकडे येत आहेत.ते यथाआवकाश प्रसिध्द करू.मात्र एस.के.ने दिव्य मराठीला धोका देवून पुण्यनगरी जॉईन केले.लोकमतला सिटी एडिशनचा संपादक म्हणून जॉईन होतो म्हणून पुन्हा पुण्यनगरीतच राहणे पसंद केले आणि आता पुढारीला येतो म्हणून एकमत जॉईन करणे,हा गेल्या पाच वर्षातील तिसरा धोका आहे.यामुळे एस.के.ची विश्वासर्हता शून्य झाली असून,एस.के.चा एकमत हा शेवटचा पेपर राहील.तसेच  आर.टी.आणि एस.के.यांचे हे एकमत किती दिवस टीकणार,हे आगामी काळातच कळेल.
आता पुढारीला नविन कार्यकारी संपादक शोधावे लागेल.पर्याय एकच आहे.मुुंबईहून विवेक गिरधारी यांना औरंगाबादला आणून बसवणे आणि गिरधारी आले तर औरंगाबाद आवृत्ती दमदार सुरू होतील अन्यथा पुढारी असून नसल्यासारखा राहील.पुढारीवाल्यांनो आता तरी शहाणे व्हा.चांगली माणसे निवडा.ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी असतात,आता तरी पटले ना...