राज गायकवाड आणि त्यांच्या पंटरविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे - नवजागृती न्यूज चॅनलच्या कर्मचाऱ्यांचा पगार बुडवणाऱ्या आणि त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे चेअरमन राज गायकवाड,त्यांच्या पत्नी जाई गायकवाड,भाऊ भास्कर गायकवाड,संचालक सलिम खंडायत,अकाऊंट माणिक शिंदे आणि हेच. आर.दीपाली सरोदे यांच्यासह सहा जणांविरूध्द पुण्यातील येरवाडा पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली असून,ही तक्रार दस्तुरखुद्द मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने नोंदवली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी संचालक सलिम खंडायत यांना चौकशीसाठी बोलावले असता,त्यांनी सांगलीकडे धूम ठोकली.दरम्यान सर्व आरोंपीवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जागृती अॅग्रो फुडस्चा मालक राज गायकवाड यांनी अनेकांना टोप्या घालण्याचा धंदा सुरू केलेला आहे.गायकवाड यांनी नव जागृती कर्मचाऱ्यंाची घोर फसवणूक केली असून,वारंवार खोटी आश्वासने दिलेली आहे.त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे.कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनीच ही तक्रार नोंदवली आहे.
काय आहे ही नेमकी तक्रार
.....................


प्रति,
    1 मा. पोलीस आयुक्त,
    पुणे शहर.
    2 मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,
    परिमंडळ
    पुणे शहर.
    3 मा. पोलीस निरीक्षक,
    पोलीस स्टेषन, पुणे.


   
अर्जदार :- संजीव लक्ष्मण शाळगांवकर, वय 57, व्यवसाय रा. सुंदर सहवास, फेज 2, बि. 11,फ्लॅट नं. 503, सनसिटी एरिया, सिहंगड रोड, पुणे-411 051.
   
           
           
           
            विषय :- नवजागृजी टेलिव्हिजन चॅनेलचे संचालक सौ. जाई गायकवाड, श्री. भास्कर गायकवाड व राज गायकवाड यांनी त्यांचे चॅनेलसाठी नेमलेल्या कर्मचा-यांचे वेतन व इतर भत्ते न देऊन सदर टी.व्ही. चॅनेल बंद करून फसवणुक व अपहार केलेबाबत तक्रार.

 महोदय,
  मी वर नमूद अर्जदार संजीव लक्ष्मण शाळगांवकर वर नमूद पत्त्यावर माझे कुटूंबियांसह रहात असून नवजागृती न्युज चॅनेलचा मुख्य संपादक म्हणुन कार्यरत आहे. जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या कंपनीचे संचालक सौ. जाई राज गायकवाड व श्री. भास्कर गायकवाड हे आहेत. सदर कंपनीने नवजागृती न्युज चॅनेल या नांवाने टेलिव्हिजन स्पेस सिग्नल दिनांक 1 जानेवारी 2015 रोजी मिळविल्यानंतर या मराठी बातम्यांचे टी. व्ही. चॅनेलचे दिनांक 24 जानेवारी 2015 रोजी उद्घाटन केले. सदर न्यूज चॅनेलचे सर्व कामकाज दोन्ही संचालकांच्या वतीने श्री. राज गायकवाड हे पहातात.
  सदर जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय व स्टुडिओ स्थापनेचे काम माहे सप्टेंबर 2014 रोजी सुरू झाले. सदर कंपनीचे एचआर मॅनेजर दिपाली सरोदे असून सलीम खंडायत हे अॅथॉरिटि सिग्नेटरी आहेत. तसेच माणिक शिंदे हे चीफ अकाऊंटंट आहेत. सदर न्यूज चॅनेलचे हेड ऑफिस, स्टुडिओ हे जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या नावाने मेरीसॉफ्ट 3, तिसरा मजला, मारीगोल्ड कॉम्प्लेक्स, मेरीप्लेक्स मॉल, बालाजी मंदिराजवळ, कल्याणी नगर, पुणे-411 014 या ठिकाणी आहे. तसेच सदर न्यूज चॅनेलचे नोंदणीकृत कार्यालय गट क्र.25/1, प्रताप नगर, टाकळी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आहे. सदर संस्थेमध्ये सुरूवातीस सदर कंपनीमध्ये राहूल भार्गव हे व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करीत होते. त्यांचे ओळखीने वर नमूद संचालक यांनी रानडे इन्स्टिटयुट, मास्क कम्युनिकेषन्स वगैरे संस्थांमधील माझेसह प्रसारमाध्यमाचे विविध कोर्स पुर्ण केलेल्या सुमारे 70 इसमांना त्यांचे सदर न्युज चॅनेलचे कार्यालयात व पत्रकारितेचे काम करण्यांकरितां साधारण 70 इसमांना माहे सप्टेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये विविध पदांवर काम करण्याचे ऑफर लेटर दिले.
त्यापैकी काही जणांना त्यांनी वार्षिक मोबदला/वेतन व इतर भत्त्यांचे आमिष दाखविले तर कांही जणांना कोणतीही रक्कम न लिहिता केवळ ऑफर लेटर देऊन आपल्या न्यूज चॅनेलमध्ये काम करण्यांकरितां नेमले. सदर कंपनीचे न्युज चॅनेल हे नवीन असल्याने सर्व कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे, उत्साहाने व स्वयंस्फुर्तीने सदर न्युज चॅनेलचे काम पुर्ण क्षमतेने व योग्य पध्दतीने सुरू रहाणेकामी ज्या ज्या तांत्रिक व प्रषासकीय बाबींची पूर्तता करणेसाठी आवष्यक त्या सूचना कंपनीच्या संचालकांना वेळोवेळी सबंधीत अॅथॉरिटीमार्फत व स्वत: राज गायकवाड यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी सुरूवातीस माहे फेब्रुवारी 2015 पर्यंत ठरल्याप्रमाणे सदर कर्मचा-यांना मोबदला/वेतन व इतर भत्ते दिले. सदर कर्मचा-यांना दिलेल्या मोबदल्यातून त्यांनी नियमाप्रमाणे व्यवसाय कर व टीडीएसची कपात केलेली आहे. परंतु माहे मार्च 2015 पासून त्यांनी कर्मचा-यांना मोबदला / वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले. कर्मचा-यांनी सुरूवातीस मागणी केल्यानंतर त्यांनी महिन्याच्या 5 तारखेला मोबदला देण्यांत येईल असे आश्वासन दिले. पुन्हा महिन्याच्या 10 तारखेला सदर मोबदला देण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 10 तारखेला मोबदला न देतां 14 तारखेचे आश्वासन कर्मचा-यांना दिले व नंतर 25 तारखेचे आष्वासन दिले. अषा पध्दतीने त्यांनी कर्मचा-यांना खोटी आष्वासने देऊन माहे मार्च महिन्याचा मोबदला/वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले. त्यानंतर सर्व कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2015 मध्ये सदर श्री. सलीम खंडायत यांचेसोबत मिटींग घेतली. परंतु त्यांनी पुन्हा खोटी आष्वासने देऊन कर्मचा-यांना मोबदला /वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले.
त्यानंतर माहे 1 मे 2015 मध्ये सांगली येथील जागृती अॅग्रो या कंपनीचीच दूसरी शाखा असलेल्या कार्यालयात पुन्हा सदर कंपनीच्या अधिकृत सिग्नेटरी अॅथॉरिटी, श्री. राज गायकवाड व इतर पदाधिका-यांबरोबर सदर कंपनीच्या कर्मचा-यांनी मिटींग घेऊन माहे मार्च व एप्रिल 2015 चे वेतन व इतर भत्ते देण्याची मागणी केली. सदर वेळेस सदर पदाधिका-यांनी त्यांच्या जागृती अॅग्रो या कंपनीच्या शेततळयांमध्ये 40 कोटींच्या माषांचे उत्पादन होणार असून लवकरच त्याच्या विक्रीतून येणा-या रकमेतून कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आष्वासन दिले. तसेच अत्याधुनिक मषिनरी घेऊन चॅनेलचे काम मोठया जोमात करण्याच्या भुलथापा देऊन कर्मचा-यांची बोळवण केली. अषा पध्दतीने माहे मार्च 2015 ते मे 2015 पर्यंत वेतन न मिळाल्यामुळे कंपनीच्या सर्व कर्मचा-यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक ओढाताण सुरू झाली. कांही कर्मचारी हे भाडयाच्या घरामध्ये राहत होते, त्यांच्या घरभाडयाची थकबाकी वाढल्यामुळे संबंधीत घरमालकांनी त्यांचे काही मौल्यवान सामान ठेवून घेऊन त्यांना घराबाहेर काढले. तसेच काही कर्मचारी हे खानावळीत जेवत होते, त्यंाचे खाणावळीचे बिल थकल्यामुळे खाणावळ मालकांनी त्यांना जेवणाचे डबे देणे बंद केले. अषा त-हेने बहुतांष कर्मचा-यांची आर्थिक ओढाताण व उपासमार होऊन तसेच रोजगाराचा ज्वलंत प्रष्न निर्माण झाल्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढला. त्यामुळे कर्मचा-यांनी अगदी अगतिक होऊन संचालकांकडे विनंती केल्यानंतर त्यांनी साधारणपणे 50 टक्के कर्मचा-यांना वेतन अदा केले. तथापि वेतनाची अनिष्चितता जाणवल्यामुळे सुमारे 15 ते 20 कर्मचारी सदर कंपनीतून काम सोडून गेले. माहे मे 2015 च्या शेवटच्या आठवडयांत कंपनीचे चीफ अकाऊंटंट श्री. श्री. माणिक शिंदे   यांच्या मोबाईल नं. 9921979090 वर श्री. राज गायकवाड यांनी स्वत त्यांचा मोबाईल फोनवरून माहे मार्च व एप्रिल चे वेतन मे अखेरपर्यंत करण्याचे आष्वासन दिले व माहे मे चे वेतन 5 जून पर्यंत करण्याचे आष्वासन दिले. सदर मोबाईलवरील संभाषण हे श्री. राज गायकवाड यांचे सांगणेवरून चीफ अकाऊंटंट श्री. माणिक षिदंे यांनी कर्मचा-यांना ऐकविले. माहे जून 2015 मध्ये पुन्हा कर्मचा-यांनी माहे 10 तारखेपर्यंत वेतन न मिळाल्यामुळे मी स्वत: व सत्यजित मंडले, योगेष वाघ असे सांगली येथील कंपनीच्या जागृती अॅग्रो या कंपनीच्या कार्यालयात श्री. राज गायकवाड यांची भेट घेतले, तेथे श्री. राज गायकवाड यांनी पगार हा दुय्यम मुद्या असून माझेकडे 10 कोटी रूपये पडुन आहेत. सदर वेळेस आम्ही श्री. राज गायकवाड यांचेबरोबर कंपनीचे कामकाज व्यवस्थित चालणेसंबंधी चर्चा केली. तथापि वेतनाचा मुद्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी नुकतेच शेळीपालनाचे क्लासेस चालु केलेले असून त्याचे माझेकडे 500 कोटी रूपये येणार आहेत, तुम्ही 60 ते 70 कर्मचा-यांचा किरकोळ प्रष्न घेऊन माझेकडे आला आहात, माझे सर्व कंपन्यांचे मिळुन 67 हजार कर्मचारी असून त्यांना मी सांभाळतो, माझेकडे 24 हजार एकर जमीन आहे अश्या  मोठमोठया भुलथापा कर्मचा-यांसमोर ठोकून कर्मचा-यांना वेतनाच्या मुद्यावर अधिक बोलू दिले नाही. तसेच तुम्ही आलाच आहात तर तुम्हांस रिकाम्या हाताने पाठवित नाही, असे म्हणुन वीस लाख रूपये किमंतीचा धनादेष जागृती अॅग्रो या कंपनीच्या खात्यावरील श्री. सलीम खंडायत यांचे वैयक्तिक नावाने दिला.
तथापि सदरील धनादेषाची रक्कम कर्मचा-यांना वेतनापोटी अदा करण्यात आलेली नाही. अषा पध्दतीने वर नमूद सर्व कर्मचा-यांना माहे मे व जून चे वेतन न मिळाल्यामुळे व अनेक कर्मचा-यांना माहे मार्च, एप्रिल चे देखील वेतन न मिळाल्यामुळे कर्मचा-यांचा धीर सूटत चालला. तथापि मी संपादक या नात्याने व माझेसह काही कर्मचा-यांनी इतर सर्व कर्मचा-यांना धीर धरण्याचा सल्ला देऊन यावर काही तरी तोडगा निघेल असे सांगून वाट पहाण्यास सांगितले. दिनांक 4 जूलै 2015 रोजी जागृजी अॅग्रोचे जनरल मॅनेजर श्री. सुजीत चव्हाण यांना श्री. राज गायकवाड यांना पुण्यात कंपनीच्या कार्यालयात पाठवून कर्मचा-यांना 10 जूलै 2015 चे दरम्यान सर्व थकित वेतन अदा करण्याचे आष्वासन दिले. परंतु दिनांक 8 जुलै 2015 रोजी श्री. राज गायकवाड यांनी श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक षिदंे यांचेकरवी कर्मचा-यांना 10 जूलै 2015 रोजी वेतन होणार नाही, असे सांगुन दिनांक 10 जुलै 2015 रोजी सांगली येथे मिटींगसाठी बोलाविले. त्यानुसार दि. 10 जूलै 2015 रोजी श्री. राज गायकवाड यांचेसह श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक शिंदे यांचेबरोबर मी व श्री. सत्यजित मंडले यांची मिटींग झाली. सदर मिटींगमध्ये श्री. राज गायकवाड यांनी 10 जूलै पर्यंत वेतन होण्याबाबत मी सुजीत चव्हाण यांस काहीही बोललो नाही, त्याला अक्कल नाही, त्यास फक्त पुण्याच्या कार्यालयात जाऊन परिस्थिती पाहून येण्याबाबत सांगितले होते, परंतु त्याने तुम्हांस चुकीच्या गोष्टी सांगितल्या, असे कथन केले. सदर मिटींगमध्ये कर्मचा-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. परंतु मिटींगमध्ये सुरूवातीस श्री. राज गायकवाड यांनी पाकिस्तानमधुन त्यांना 600 कोटी रूपयांची मटनाची ऑर्डर असून तुम्ही त्याच त्याच पगाराच्या किरकोळ मुद्यावर माझेषी चर्चा काय करतां, असे सांगुन नंतर पगाराच्या मुद्यावर माझे विरोधात बोलत आहात असे मला समजले आहे, परंतु माझेकडे 12 वकीलांची टीम आहे, पोलीस यंत्रणा माझे खिषात आहे, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर यांचेषी माझे घनिष्ठ संबंध असून त्यांना एका फोनवरून मी त्यांचेकडून काहीही करून घेऊ शकतो, असे म्हणुन कर्मचा-यांषी अरेरावीची भाषा केली. तसेच एप्रिल व मे महिन्याचे सर्वांचे वेतन 14 जूलै 2015 पर्यंत व जून महिन्याचे वेतन 25 जूलै 2015 रोजीचे वेतन करण्याचे आष्वासन दिले. वर नमूद केल्याप्रमाणे श्री. राज गायकवाड यांनी एचआर मॅनेजर दिपाली सरोदे यांचे मार्फत पगाराचे आष्वासन देणारा ई-मेल पाठविला. सदर ई-मेलमध्ये दोन ते तीन महिने कंपनीचे कामकाज थांबविण्याबाबतचा मजकूर लिहिला असून त्यानंतर पुन्हा कंपनीचे कामकाज चालू होईल असे आष्वासन दिलेले आहे. सदर ई-मेल मध्ये कर्मचा-यांना दूसरी नोकरी शोधण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु काही कर्मचा-यांना माहे एप्रिल 2015 चे वेतन दिनांक 17 जूलै 2015 रोजी देऊन बाकीच्या कर्मचा-यांना अद्यापपर्यंत कोणतेही वेतन दिलेले नाही. महोदय, अषा रितीने कर्मचा-यांचे वेतन न देऊन सदर कंपनीच्या संचालकांनी तसेच वर नमूद पदाधिका-यांनी कर्मचा-यांची फसवणूक केलेली आहे तसेच त्यांच्या वेतनाच्या रकमेचा अपहार केलेला आहे. श्री. राज गायकवाड यांनी कंपनीचे चीफ अकाऊंटंट यांचेमार्फत कर्मचारी यांना दिनांक रोजी दादाच्या म्हणजेच राज गायकवाडच्याऋ नादी लागू नका, तो खुप डेंजर माणूस आहे, त्याच्या मोठमोठया राजकारणी, पोलीस व वरिष्ठ प्रषासकीय अधिका-यांषी घनिष्ठ संबंध आहेत अषी दमदाटी केली. श्री. राज गायकवाड यांचा ओंकार पंडीत हा कंपनीच्या आयटी मध्ये काम करणारा मित्र असून दिनांक 4 जूलै 2015 रोजी संध्याकाळी संध्या साधारण 5.30 ते 7.00 वा. चे दरम्यान कंपनीचा डेस्क एडिटर श्री. प्रसाद खेकाळे याला सांगा, दादांबद्यल काही बोलू नको, त्यांच्या नादी लागू नको, आई आणि बायको वरून षिवीगाळ करून अष्लील भाषा योगष वाघ, नितीन रिंढे, गणेष खळदकर यांचेसमोर केली. एव्हढे होऊन देखील सर्व कर्मचारी हे अत्यंत शांतपणे संचालकांसमोर त्यांच्या व्यथा मांडीत राहिले. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने दिनांक 17 जूलै 2015 रोजी कंपनीच्या कार्यालयाबाहेर सर्व कर्मचा-यांनी मुक निदर्षन केले. कर्मचारी अषा पध्दतीने मुक निदर्षन करीत आहेत हे पाहून कंपनीने 17 जूलै 2015 पासून कंपनीचा स्टुडिओ, पीसीआर, एमसीआर, एडिटग्रॉफिक्स रूम यांना टाळे ठोकलेले आहे. मा. महोदय कंपनीच्या संचालकांचे व श्री. राज गायकवाड यांचे आजतागायतचे वर्तन व इतिहास पहातां त्यांनी सुरूवातीस पंढरपूर येथे चेन मार्केटिगं पध्दतीचा व्यवसाय सुरू करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. तसेच जागृजी अॅग्रो या नांवाने कंपनीने अनेक गरीब शेतक-यांना खोटे आष्वासने देऊन फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रातील प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रसिध्द आणि विष्वसनीय फेसबुक पेज आणि ब्लॉग बेरक्या उर्फ नारद या ब्लॉगने देखील कंपनीच्या अषा फसवणुकीच्या प्रकारांची दखल घेतलेली आहे. सदर ब्लॉगने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर स्वत श्री राज गायकवाड यांनी त्या पेजवर सर्व कर्मचा-यांचे सर्व थकित वेतन दिनांक 17 जूलै 2015 रोजी बँकेत जमा केले असल्याचे खोटे जाहीर केले व अगदी मोजक्या कर्मचा-यांचे माहे एप्रिल 2015 पर्यंतचे वेतन जमा केले. कर्मचा-यांनी वारंवार सॅलरी स्लीप व टीडीएस कपातीचे प्रमाणपत्र मागून देखील कंपनीने आजतागायत त्याची पूर्तता केलेली नाही. आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवर कंपनीने भेटी लागी जिवा या कार्यक्रमासाठी जवळपास 15 लाखाची जागृती अॅग्रोची जाहिरात दिलेली आहे. तसेच इफ्तार पार्टयाचे आयोजन करून लाखो रूपयांची उधळपट्टी कंपनी करीत आहे. तसेच राज गायकवाड यांनी स्वत:चा वाढदिवस देखील अंदाजे 5000 लोकांना निमंत्रण देऊन सामिष जेवण व गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून मोठया प्रमाणात पैषाची उधळपट्टी केलेली आहे. अषा प्रकारे कंपनीने स्वत:चे न्यूज चॅनेल बंद करून, कर्मचा-यांकडून आजतागायत कंपनीचे काम करून घेऊन त्यांचे वेतनाची रक्कम अषा प्रकारे उधळून कंपनीचे वर नमूद संचालक, राज गायकवाड, श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक शिंदे , एचआर मॅनेजर दिपाली सरोदे यांनी कर्मचा-यांची घोर फसवणुक केली व त्यांच्या वेतनाच्या रकमेचा अपहार केलेला आहे, अषी माझी सर्व कर्मचा-यांच्या वतीने तक्रार आहे. तसेच श्री. राज गायकवाड, माणिक शिंदे, ओंकार पंडीत यांनी कर्मचा-यांना दमदाटी व अष्लील भाषेत षिवीगाळ केलेली आहे. सबब वर नमूद सर्व इसमांविरूध्द योग्य ती कायदेषीर कारवाई करावी, ही विनंती.
संजीव लक्ष्मण शाळगांवकर