धुळे कोर्ट भेटीशी प्रशांत बाग़ यांचा संबंध नाही!!

सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्या धुळे कोर्ट भेटीशी प्रशांत बाग़ यांचा संबंध नाही!!
मित्रानो,
'जय महाराष्ट्र'चे प्रशांत बाग़ यांचा मला नुकताच Call आला होता. मी यापूर्वी टाकलेल्या पोस्ट्मधील उल्लेख हा कोर्टात/धुळे कारागृहात सबमीट केलेल्या यादीवरुन होता. त्या यादीत प्रशांत बाग़ यांचे नाव आहे; मात्र ते त्यांच्या कन्सेण्टशिवाय, परस्पर घेतले गेले आहे. ते काल धुळ्यात नव्हतेच. ते तुरुंगात जाण्याचा काही प्रश्नाच नव्हता. मीही त्या पोस्टमध्ये प्रशांत बाग़ धुळे तुरुंगात दादा-आप्पांना भेटायला गेले, असा उल्लेख केलेला नाही. कोर्टाच्या यादीत मात्र त्यांचे नाव आहे.
खरेतर मी कुठेही चुकीचे लिहिलेले नाही तरीही प्रशांत बाग़ यांच्याशी झालेल्या बोलण्यावरुन त्यांना मनस्ताप होतोय, असे जाणवले! त्यामुळे मी दिलगीरी व्यक्त करतो! पुनश्च सांगतो, प्रशांत बाग़ हे काल धुळे तुरुंगात गेले नव्हते.
याव्यतिरिक्त यापूर्वीच्या पोस्टमधील सर्व मजकूर कायम आहे. जे कृत्य काल तुरुंगात गेलेल्या पत्रकारांनी केलेय ते पेशाला काळीमा फ़ासणारे व् शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे!
कोर्टाला सादर यादीतच घोळ आहे, कोर्टाची दिशाभूल केली गेलीय की काय, असे वाटतेय म्हणून त्यावर स्वतंत्र लिहीता येईल, असे मी म्हटलेच आहे. 'मटा'ला कुणी कुलकर्णी संपादकच नाही. एकाच दैनिकाचे जास्त प्रतिनिधी आणि इतर दैनिकांचे प्रतिनिधीत्व नाही. कोर्टाला सादर या यादीचा निकष कळायला मार्ग नाही. ही काही पत्रकार संघ किंवा मान्यताप्राप्त संघटनेकडून संपादक, पत्रकार, दैनिकांची यादी कोर्टाला सादर झालेली नाही.
From
विक्रांत पाटील, कार्यकारी संपादक - जनशक्ति, जळगाव
+91 7767012222/8007006862
vikrant@janashakti.in