>> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

चांगल्या समाजासाठी मध्ये वाईट घडले ...

चांगल्या समाजासाठी काम करणा-या एका वाहिनीतलं अँकर युगुल दुसरंच काम करताना सीसीटीव्हीत कैद झालं. एचआरकडून सीसीटीव्हीतल्या चित्रीकरणाची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अँकर युगुलाला एचआरने सक्त ताकीद दिली आहे. सध्या मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक मीडियात या प्रकरणाची जोरदार रसभरीत चर्चा सुरू आहे. नंतर या युगुलावर काय कारवाई झाली हे अजून कळू शकलं नाही.

दिव्य मराठी...मराठी आहे की हिंदी ?

औरंगाबाद - दिव्य मराठीमध्ये 6 डिसेंबरच्या अंकात 'दिव्य' घडले आहे.हे वृत्तपत्र मराठी असताना बातमीमध्ये चक्क हिंदी ओळी वापरण्यात आल्या आहेत.हिंदीमधील बातमी मराठीमध्ये भाषांतर करताना,पान 1 च्या उपसंपादकाने ही घोडचूक केली आहे.भोपाळशेठ आता या उपसंपादकाच्या हातात 'भोपळा' देण्याची शक्यता आहे.
दि.5 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता उर्फ अम्मा गेल्या आणि संपूर्ण तामिळनाडू पोरका झाला.त्याची बातमी दिव्य मराठीमध्ये 6 डिसेंबर रोजी पान 1 वर प्रसिध्द झाली आहे.या बातमीममध्ये उपसंपादकाने हिंदी बातमी मराठीमध्ये भाषांतर करताना हिंदी ओळी तशाच सोडून दिल्या.विशेष म्हणजे ही बातमी पान 1 वर फ्लायर आहे.
तसेच आणखी एक मोठी चूक म्हणजे 'प्रतिज्ञा' या हिंदी शब्दाला 'शपथ' हा मराठी शब्द असतानाही प्रतिज्ञाच ठेवला.आता याला दिव्य म्हणावे की आणखी काय ?
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/06122016/0/1/
 

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

डॉक्टरची टूरटूर

एक पाऊल मागे चॅनेलच्या डॉक्टरने पुन्हा सालाबादाप्रमाणे टूर काढली आहे. शुगरे आणि काळू मामा या दोन टोळ्यांमधल्या निष्ठावंतांची टूरसाठी निवड करण्यात आली. शुगरे आणि काळूमामा डॉक्टरचे डावे-उजवे हात. मात्र या दोघांनाही डॉक्टरने कामावरून काढलं होतं. मग दोन्ही टोळ्यांमधल्या सदस्यांनी डॉक्टरच्या हाता-पायापडून कामावर घ्यायला भाग पाडलं होतं. तेव्हापासून शुगरे आणि काळूमामा डॉक्टरापासून दुरावले. आता हे दोघेही डॉक्टरवर जोक करतात. अर्थात सगळेच हा 'विनोद' करण्यात आघाडीवर असतात. तर या थंडीतही काही जणांना घाम फुटला आहे. टूरमध्ये डॉक्टरच्या बढाया ऐकाव्या लागणार या कल्पनेनेच बरेच जण घामाघूम झाले आहेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

गिरधारी- बाबर वादातूून दोन रिपोर्टरचा बळी

ठाणे - पुढारीची ठाणे आवृत्ती स्वतंत्र निघणार असून,त्यासाठी उपसंपादक आणि रिपोर्टरची भरती करण्यात येणार आहे.दुसरीकडे रिपोर्टर सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.
पूर्वी ठाणे आवृत्ती मुंबई आवृत्तीच्या अंतर्गत होती.माय ठाणे नावाचे चार पेज दिले जात होते.सोनल लाडे,स्वप्नाली पवार,प्रवीण सोनवणे,नरेंद्र राठोड,अनुपमा गुंडे असे पाच रिपोर्टर काम करत होते.सहा महिन्यापूर्वी ब्युरो चिफ म्हणून विजय बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.मात्र बाबर आणि संपादक विवेक गिरधारी यांच्यात पटेनासे झाले,त्यातून गिरधारी यांनी बाबर यांना शह देण्यासाठी दिलीप शिंदे यांची चिफ रिपोर्टर म्हणून नियुक्ती करून सर्व अधिकार शिंदे यांना दिले.त्यानंतर बाबर यांनी गिरधारी यांच्यावर मात करून मालक पद्मश्रींकडून सर्व  अधिकार पुन्हा  प्राप्त केले.त्यानंतर बाबर यांनी ठाणे आवृत्ती स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला पद्मश्रींनी हिरवा कंदील दिला आहे.
दुसरीकडे निष्क्रियतेचा ठपका ठेवून सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.या दोघी गिरधारींच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.गिरधारी- बाबर यांच्यातील वादातून या दोघींचा बळी गेला आहे.त्याचबरोबर प्रवीण सोनवणे आणि नरेंद्र राठोड देखील रडारवर आहेत.बाबर -  गिरधारी वादातून रिर्पाटरचा बळी दिला जात आहे.सोनल लाडे ही गेल्या दोन वर्षापासून तर स्वप्नाली पवार एक वर्षापासून पुढारीत कार्यरत होती.बातम्या लिहिता येत नाहीत,हा जावाईशोध आताच का लावण्यात आला,असा प्रश्‍न या दोघांना पडला आहे.
धन्य ते पुढारी...धन्य ते गिरधारी आणि धन्य ते बाबर...पुढारीचा चांगभले...

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

पुण्यात सकाळचा खप लोकमतपेक्षा पाचपट

पुणे -  लोकमतने हंसाच्या रिपोर्टनुसार पुण्यात नंबर 1 चा दावा केला असला तरी  तो फोल ठरला आहे.एबीसीच्या आकडेवारीनुसार पुण्यात सकाळचा खप लोकमतपेक्षा पाचपट आहे.
वृत्तपत्राचा खप  हा एबीसीच्या रिपोर्टनुसार ग्राह्य धरला जातो.जानेवारी  ते जून 2016 चा एबीसी रिपोर्टनुसार पुण्यात सकाळचा खप 5 लाख 97 हजार 215 आहे तर लोकमतचा खप हा 1 लाख 26 हजार 369 आहे.यावरून लोकमतपेक्षा पाचपट सकाळचा खप आहे,हे स्पष्ट होते.सकाळचा सर्व आवृत्तीचा एकूण खप 12 लाख 81 हजार 449 आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा सकाळ नंबर 1 दैनिक ठरले आहे.
पुण्यात सकाळला तोड नाही.पुणे म्हणजे सकाळ आणि सकाळ म्हणजे पुणे असे समीकरण तयार झाले आहे.वाचकांना सकाळ वाचल्याशिवाय दिवस जात नाही,असे अनेकांचे म्हणणे आहे.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

नोटाबंदीचा फटका पुढारीलाही....

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका पुढारीलाही बसला आहे.त्यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.यामुळे पुढारीचे कर्मचारी.वार्ताहर अस्वस्थ झाले आहेत.पुढारी प्रकाशनापुर्वीच पुन्हा एकदा गाशा गुंडाळणार की काय,अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे,मात्र नोटाबंंदीची समस्या सुटल्यानंतर पुढारी सुरू करण्यात येईल.असे पुढारीच्या एका सुत्राने सांगितले.
नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने,अशी म्हण पुढारीला नेहमीच लागू पडते,ती पुन्हा एकदा लागू पडली आहे.पुढारीचा पहिल्यांदा 17 सप्टेंबर.नंतर दिवाळी मुहुर्त हुकल्यानंतर आता 17 नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता,परंतु हा मुहुर्तही आता नोटांबदीच्या निर्णयामुळे हुकला आहे.
500 आणि 1000 रूपयाच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर पुढारीला चलन तुटवड्याचा सामना करावा करावा लागत आहे.या चलन तुटवड्यामुळे पुढारीची अनेक कामे अडल्याची माहीती देण्यात आली.तथापी,पुढारीचा डमी अंक दररोज काढला जात आहे.मराठवाड्यातील बातम्या ऑनलाईन पुढारीवरही झळकत आहेत.एकीकडे चलन तुटवडा आणि दुसरीकडे प्रिटींग मशिनचा प्रॉब्लेम यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.तो कधी हालणार हे आता प्रत्यक्षात पद्मश्रीच सांगू शकतात...

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

महाराष्ट्र 1 च्या कार्यकारी संपादकपदी आशिष जाधव

मुंबई - बेरक्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे.महाराष्ट्र 1 न्यूज चॅनेलच्या कार्यकारी संपादकपदी आशिष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयबीएन- लोकमतमध्ये अनेक वर्षे पॉलिटिकल बीट सांभाळणारे आशिष जाधव निखिल वागळे यांच्यासोबत महाराष्ट्र 1 मध्ये आले होते.त्यांना पॉलिटिकल एडिटर करण्यात आले होते.वागळेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आली असून,त्यांना कार्यकारी संपादक करण्यात आले आहे.
दरम्यान,वागळेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पंटरमध्ये खळबळ उडाली आहे.फिचर एडिटर प्राजक्ता धुळपने राजीनामा दिला असून,पाठोपाठ रिर्पाटर नम्रता भिंगार्डेनेही चॅनल सोडणे पसंद केले आहे.पुण्याची ब्युरो प्राची कुलकर्णीने दुसरीकडे संधी शोधणे सुरू केल्याचे वृत्त आहे.
वागळेंच्या राजीनाम्यानंतर अनेक विकेट पडण्याची शक्यता बेरक्याने वर्तवली होती,आता ही शक्यता खरी ठरू लागली आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook